Ad will apear here
Next
‘पेटीएम बँके’ला नवीन ग्राहक स्वीकृतीसाठी ‘आरबीआय’ची मान्यता
मुंबई : भारताची सर्वात मोठी डिजिटल बँक असलेल्या पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडला भारतीय रिझर्व बँकेकडून (आरबीआय) ३१ डिसेंबर २०१८ पासून बँक आणि वॉलेट ग्राहकांसाठी केवायसी सुरू ठेऊन नवीन ग्राहक स्वीकारण्याची अधिकृत परवानगी मिळाली आहे. त्यामुळे संभाव्य ग्राहकांना आता पेटीएम पेमेंट बँक लिमिटेडमध्ये आपले बचत किंवा चालू खाते उघडता येणार आहे.

पेटीएम पेमेंट बँक लिमिटेडने वरिष्ठ बँकर सतीश गुप्ता यांची व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. गुप्ता यांच्या पाठीशी तब्बल तीन दशकांपेक्षा जास्त बँकिंग आणि पेमेंट्स प्रणालीचा अनुभव असून, यापूर्वी ते एसबीआय आणि नॅशनल पेमेंट्स कार्पोरेशन ऑफ इंडियाशी निगडीत होते. आपल्या व्हिजनला अनुसरून २०१९ अखेरपर्यंत आणखी १०० दशलक्ष ग्राहक मिळवण्याचे या बँकेचे ध्येय आहे.

पेटीएम पेमेंट्स बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गुप्ता म्हणाले, ‘पेटीएम पेमेंट्स बँक प्रत्येक भारतीयापर्यंत बँकिंग सेवा पोहोचविण्याच्या मिशनवर आहे. डिजिटलचा स्वीकार करण्यात मदत करणे आणि जास्तीत जास्त लोकांना डिजिटल व्यवहारांची समज देणे हे त्यांचे व्हिजन आहे. आमचा विश्वास आहे की, यामुळे आपली अर्थव्यवस्था औपचारिक होण्यास आणि आर्थिक समावेशकता वाढवण्यास मदत होईल.’

पेटीएम पेमेंट्स बँकेच्या ग्राहकांना मोफत बँकिंग सेवेसह बचतीवर वार्षिक चार टक्के व्याज दिले जाते. पेटीएम पेमेंट बँक लिमिटेडकडे एक अत्यंत सशक्त आणि सुरक्षित टेक्नॉलॉजी इन्फ्रास्ट्रक्चर असून ही बँक आपल्या ग्राहकांना त्यांच्या खात्यात एक लाख रुपयापर्यंत जमा करण्याची अनुमती देते. बँक खात्याच्या इतर वैशिष्ट्यांत व्हर्चुअल पासबुक, डिजिटल आणि प्रत्यक्ष डेबिट कार्ड आदींचा समावेश आहे.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/LZYLBW
Similar Posts
‘फेअरसेंट’ला ‘आरबीआय’चे ‘एनबीएफसी-पी२पी’ प्रमाणपत्र मुंबई : ‘फेअरसेंट.कॉम’ या भारतातील सर्वात मोठ्या ‘पी२पी’ कर्ज मंचाला भारतीय रिझर्व बँकेकडून (आरबीआय) ‘एनबीएफसी-पी२पी’ प्रमाणपत्र मिळाले आहे, ज्यामुळे या उद्योगातील त्यांचे स्थान अग्रणी असल्याचे अधोरेखित झाले आहे. त्यामुळे राष्ट्रीय नियामकाकडून ‘एनबीएफसी-पी२पी’ म्हणून नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त ‘फेअरसेंट
‘लेनदेनक्लब’ला बिगरबँकिंग वित्तीय कंपनीची मान्यता मुंबई : ‘लेनदेनक्लब’ ही वेतनधारक कर्जदारांना कर्ज देणारी ऑनलाइन बाजारपेठ आहे. या कंपनीला आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन प्राप्त झाले आहे, यामुळे या कंपनीला आता बिगरबँकिंग वित्तीय कंपनी (एनबीएफसी) म्हणून व्यवसाय करता येणार आहे.
‘एनपीसीआय’द्वारे डिजिटल व्यवहारांना सुरक्षा उपक्रम मुंबई : ग्राहकांना डिजिटल रकमेच्या देवाणघेवाणीचा सुलभ, सुरक्षित अनुभव देण्यासाठी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) ही संस्था आघाडीवर असून, डिजिटल व्यवहारांमध्ये झालेली वाढ लक्षात घेऊन ‘एनपीसीआय’ने अॅप्लिकेशन्समध्ये विविध सुरक्षा नियंत्रणे वापरून ग्राहकांच्या सुरक्षिततेची प्रक्रिया सुरू केली आहे
‘पीपीबीएल’ बनली नफा नोंदवणारी भारतातील पहिली पेमेंट्स बँक मुंबई : पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडने (पीपीबीएल) आपल्या संचालनाला दोन वर्षे पूर्ण झाली असल्याची घोषणा नुकतीच केली. संचालनाच्या दुसऱ्याच वर्षात नफा कमावणारी ‘पीपीबीएल’ ही भारतातील पहिली पेमेंट्स बँक बनली आहे. कंपनीने २०१८-१९ या आर्थिक वर्षात १९ कोटी रुपयांच्या नफा वृद्धीची नोंद केली आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language